smita patil

आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता पाटील यांची आज पुण्यतिथी १३ डिसेंबर १९८६ ला केवळ ३१ व्या वर्षी स्मिताने जगाचा निरोप घेतला आणि निख्खळ हस्याची अभिनेत्री कायमची हरवली, पण तिच्या आठवणी कायम आहे. १९७० मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून कारकिर्दीला सुरूवात केली.

१९७४ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. स्मिता पाटील यांचे जवळजवळ सगळे सिनेमे गाजले. तिच्या सिनेमांबरोबर तिचं खासगी आयुष्यही कायम चर्चेत राहीलं. स्मिता चित्रपटादरम्यान राज बब्बर यांच्या प्रेमात पडली. आपल्या प्रेमासाठी ती सगळ्यांसाठी लढली.

raj-smita

राज बब्बर हे विवाहीत होते. त्यांना दोन मुलं होती. त्यामुळे स्मिताच्या घरून त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण स्मिताने त्यांना जुमानलं नाही. १९८२ साली आलेल्या भिगी पलकेच्या सेटवर या दोघांची भेट झाली. शुटींगच्या पहिल्याच दिवशी या दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या. छोटासा वादही झाला. पण स्मिताने वापरलेला एक शब्द राज बब्बरच्या मनात घर करून राहिला. आणि त्याच क्षणी ते स्मिताच्या प्रेमात पडले.

राज बब्बर यांनी आपली बायको नादिरालाही याविषयी सांगितलं. त्यानंतर नादिरा यांनी त्यांच्या आयुष्यातून जाण्याचा निर्णय घेतला. नादिराचा संसार उद्धवस्त केल्याचा आरोप स्मितावर केला गेला. पण स्मितावर याचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर स्मिता आणि राज यांचे लग्न झाले.

स्मिताला घऱ फोडणारी महिला ठरवण्यात आलं. या टीकेनंतर स्मिता आतून खचून गेली होती. नेहमी उत्साही असणारी स्मिता अचानक शांत झाली. अनेकदा तीने राज बब्बरशी लग्न तोडण्याचा विचार केला. पण त्यांच लग्न कदाचीत नियतीलाच मान्य नव्हतं. १३ डिसेंबर १९८६ राज आणि स्मिताचा मुलगा प्रतिकचा जन्म झाला आणि काही तासातच स्मिताने जगाचा निरोप घेतला.