यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ थर्सडे’ चित्रपटाची झाली घोषणा

बेहजाद खंबाटा यांच्याद्वारे लिखित आणि दिग्दर्शित ‘अ थर्सडे’(a thursday) मध्ये यामी गौतम(yami gautam) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘आरएसवीपी’ आणि ‘ब्लू मंकी फिल्म्स’ यांनी या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. यामध्ये यामी गौतम ही नैना जैसवाल या प्ले स्कूल शिक्षिकेची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

‘अ थर्सडे’ विषयी बोलताना अभिनेत्री यामी गौतम म्हणाली की, ‘अ थर्सडे’ एक अशी दुर्मिळ स्क्रिप्ट आहे जिला तुम्ही नकार देऊ शकत नाही. बेहजादने कोणत्याही महिला नायिकेसाठी लिहिलेल्या सर्वात मजबूत पात्रांपैकी ही एक लिहिले आहे. माझी व्यक्तिरेखा नैना ही हिंसक आणि प्रेमळ अशा संमिश्र प्रकारची आहे.

रॉनी स्क्रूवाला म्हणाले की, आरएसवीपीमध्ये, मी नेहमीच चौकट मोडणाऱ्या नव्या प्रतिभा आणि नव्या स्क्रिप्ट्सचे स्वागत केले आहे. ही एक शानदार पद्धतीने लिहिली गेलेली थ्रिलर आहे. जी केवळ तुम्हाला खुर्चीला खिळवूनच ठेवणार नाही तर, शेवटी तुमच्या मनात समाजातील अनेक गोष्टींबद्दल प्रश्न निर्माण होतील. यामी एक कसलेली कलाकार आहे आणि तिला ग्रे शेडमधली ही व्यक्तिरेखा साकारताना पाहणे प्रेक्षकांसाठी अभूतपूर्व असेल. बेहजादने पटकथेवर उत्तम काम केले आहे आणि एखादे कथानक जिवंत करण्याची त्यांची दृष्टी अप्रतिम आहे. हा चित्रपट २०२१ साठीच्या आमच्या डायरेक्ट-टू- डिजिटलचा भाग असणार आहे.

दिग्दर्शक बेहजाद खंबाटा म्हणाले की,  मी रॉनी व आरएसवीपीसोबत काम करण्यास उत्सुक आहे. ही स्क्रिप्ट लिहिताना माझ्या मनात यामीच होती कारण मी तिला कधीच अशातऱ्हेची क्रेझी व्यक्तिरेखा साकारताना पाहिलेले नाही. जेव्हा यामीने या चित्रपटासाठी होकार दिला तेव्हा मी खरोखर रोमांचित झालो. आता सेटवर कधी एकदा जातोय, याची उत्सुकता आहे.

आरएसवीपी आणि ब्लू मंकी फिल्म्सद्वारे निर्मित ‘अ थर्सडे’ २०२१ मध्ये डिजिटल प्लॅटफार्मवर प्रदर्शित होणार आहे.