दीपिकाच्या द्रौपदी लांबणीवर, आधी दिसू शकते सीतेच्या भूमिकेत!

मधु पुन्हा एकदा ऐतिहासिक कथेच्याच प्रेमात असून, आता ते महाभारतांच्या अगोदर ‘रामायण’ बनवण्याच्या मूडमध्ये आहेत.

    हिंदी सिनेसृष्टीत सध्या जणू काही महाभारत आणि रामायणातील व्यक्तिरेखांवर चित्रपट बनवण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. निर्माते मधू मंटेना यांनीही २०१९मध्ये दीपिका पदुकोणला घेऊन ‘महाभारत’ बनवण्याची घोषणा केली होती. या चित्रपटात द्रौपदीच्या दृष्टिकोनातून ‘महाभारत’ पहायला मिळणार असल्याचं तेव्हा सांगण्यात आलं होतं. आता हाती आलेल्या माहितीनुसार प्लॅन थोडासा बदलण्यात आल्याचं समजतं.

    मधु पुन्हा एकदा ऐतिहासिक कथेच्याच प्रेमात असून, आता ते महाभारतांच्या अगोदर ‘रामायण’ बनवण्याच्या मूडमध्ये आहेत. मधू यांच्या या चित्रपटातही दीपिकाच दिसणार आहे, पण तो ‘महाभारत’ नसेल. मधू यांना द्रौपदीच्या दृष्टिकोनातून ‘महाभारत’ दाखवण्यासाठी बराच रिसर्च करावा लागणार असून, पटकथेवर काम करण्यासाठीही खूप वेळ लागणार आहे. या दोन्ही प्रोजेक्टसाठी मधू यांची पहिली पसंत दीपिकाच असल्याचं बोललं जात आहे.

    दीपिका दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू शकते यावर मधू आणि त्यांच्या टीमचं एकमत झाल्याचीही माहिती मिळाली आहे. आता दीपिका महाभारताच्या अगोदर रामायण करायला तयार होते आणि त्यासाठी तिच्याकडे पुरेसा वेळ आहे का ते पहायचं आहे.