दीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स्क्रिप्ट्स

देश दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊनमध्ये आहे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. अधिकाधिक लोक घरून काम करत आहेत आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नावदेखील या यादीत सामील आहे. दिपिका या

 देश दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊनमध्ये आहे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. अधिकाधिक लोक घरून काम करत आहेत आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नावदेखील या यादीत सामील आहे. दिपिका या दिवसांमध्ये ऑनलाईन स्क्रिप्ट्स नरेशनमध्ये आपला वेळ घालवत आहे. 

दीपिका कलाकाराच्या नात्याने, या लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग करते आहे आणि चित्रपट निर्मात्यांसोबतच्या व्हर्च्युअस मीटिंग सुरु आहेत. हा दीपिकासाठी नवा आधुनिक डिजिटल पर्याय आहे. अभिनेत्री आपल्या आधी घोषित झालेल्या प्रोजेक्ट्सवर देखील काम करते आहे आणि सोबतच आपले आगामी प्रोजेक्ट निवडण्यासाठी आणि जगभरातील चाहत्यांसाठी अधिक यादगार व्यक्तिरेखा साकारण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नव्या स्क्रिप्ट्स पण ऐकत आहे. जर लॉकडाऊन नसता, तर दीपिका आता श्रीलंकेमध्ये शकुन बत्रा यांच्या आगामी अनटाइटल्ड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असती, ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे देखील दिसणार आहेत.