दीपिका पादूकोनने आपल्या परदेशी हेअर ड्रेसरची अशी घेतली फिरकी, धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात दीपिकाने तिच्या हेअर ड्रेसरला तिखट-मीठ लावलेली कच्ची कैरी खायला दिली.

  बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकताच दीपिकाने एक विनोदी व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओत दीपिकाने तिच्या हेअर स्टायलिस्ट सोबत प्रँक केला आहे. दीपिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतोय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात दीपिकाने तिच्या हेअर ड्रेसरला तिखट-मीठ लावलेली कच्ची कैरी खायला दिली. यात आपण पाहू शकतो की दीपिकाचा हेअर ड्रेसर यीयानी हा भारतीय नसून विदेशी आहे. त्यामुळे ही तिखट कैरी खाल्यानंतर यीयानीचा चेहरा चांगलाच लालबूंद झाला आहे. यीयानी या तिखट कैरीचा फक्त एक तुकडा तोंडात टाकतो त्यानंतर त्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो. यावर दीपिका त्याची मस्करी करत त्याला विचारते “काय झालं यीयानी” यावर यीयानी म्हणतो, “माझ्या तोंड्याची आग होतेय. तुला हे का आवडतं?”

  तर कैरी खावून हेअर ड्रेसर यीयानीची अवस्था पाहून दीपिकाला मात्र हसू आवरणं कठीण झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतंय. हा विनोदी व्हिडीओ दिपीकाने शेअर केलाय. दीपिकाच्या या धमाल व्हिडीओला अनेक चाहत्यांनी पसंती दिलीय.