Video: दीपिकाचा रणवीरबरोबर भन्नाट डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

'Werk it baby' असे कॅप्शन देत दीपिकाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच तिने '#bussitchallenge' चॅलेंजही ट्रेंड केले आहे. दीपिका आणि रणवीरच्या या फनी व्हिडीओला काहीच तासांत लाखो लाईक्स मिळाले आहेत.

  बॉलिवूडचं लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग. रिल असो की रिअल या कपलची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते. या कपलचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बघून तुम्ही हासून वेडे व्हाल. दीपिकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दीपिका व रणवीर दोघेही Werk it baby या गाण्यावर फनी डान्स करताना दिसत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  व्हिडीओत कलफूल नाईट सूट आणि डोक्यावर हॅट घातलेली दीपिका डान्स करते. पाठोपाठ रणवीरही तिच्यासोबत डान्स करु लागतो. रणवीर डान्स करत असतनाच दीपिका त्याला धक्का देते आणि खाली पाडून स्वत: नाचू लागते. यावेळी रणवीरच्या चेह-यावर जे भाव उमटतात, ते तुम्ही पाहायलाच हवेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  ‘Werk it baby’ असे कॅप्शन देत दीपिकाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच तिने ‘#bussitchallenge’ चॅलेंजही ट्रेंड केले आहे. दीपिका आणि रणवीरच्या या फनी व्हिडीओला काहीच तासांत लाखो लाईक्स मिळाले आहेत. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी हटके कमेंट या व्हिडिओवर केल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)