deepika padukone

दीपिकाला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान(Deepika Padukone Became Asia`s Most Influential Woman) मिळाला आहे.

  बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण(Deepika Padukone) एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. फक्त देशात नाही तर संपूर्ण जगात तिने एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.नुकतंच दीपिकाला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान(Deepika Padukone Became Asia`s Most Influential Woman) मिळाला आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून तिचा गौरव करण्यात आला आहे. हा सन्मान मिळवणारी दीपिका पहिली भारतीय अभिनेत्री आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  सर्वाधिक चाहतावर्ग असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिका टॉप १०० मध्ये येते. सध्या दीपिकाचे इन्स्टाग्रमावर जवळपास ५९.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. गुगलवरही ती नेहमीच ट्रेडींगवर पाहायला मिळते. दीपिकाच्या सर्वाधिक चाहत्यावर्गामुळे तिला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून निवडण्यात आले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)


  दीपिकाने सिनेसृष्टीत पाऊल ठेवून तिला १३ वर्ष झाली आहेत. यादरम्यान तिने बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्ये तिची वेगळी छाप पाडली आहे. दीपिका ही अनेक ब्रँडच्या जाहिरातीत काम करते. आगामी काळात ती रणवीर सोबत ‘८३’ या चित्रपटात झळकणार आहे.