दीपिका पादुकोणचे स्पोर्ट्स कलेक्शन विक्रीसाठी होणार खुले

अभिनेत्री दीपिका पादुकोण(deepika padukon), राष्ट्रीय खेळ दिवस(national sports day) अर्थात २९ ऑगस्टला आपला खास ‘स्पोर्ट्स एडिट’ संग्रह(sports edit collection) खुला करणार आहे. महत्वाची बाब म्हणजे यातून जमा होणारी रक्कम तिच्या ‘द लाईव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन’ या मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी देण्यात येणार आहे.

हा संग्रहाचे अनावरण राष्ट्रीय खेळ दिवसाचे औचित्य साधून करण्यात येणार असून यामध्ये दीपिकाच्या वैयक्तिक संग्रहातील निवडक कपडे तसेच खेळाचे कपडे, खेळ साधने यांचा समावेश असणार आहेत. स्टेपल टीजपासून परफॉरमन्स ओप्टीमायझिंग वर्कआऊट साधनांपर्यंत सर्व काही या ‘स्पोर्ट्स एडिट’ संग्रह, ही चाहत्यांसाठी एक मोठी ट्रीट असणार आहे. या संग्रहामध्ये काही लिमिटेड एडिशन स्नीकर्सदेखील आहेत. ज्यावर चाहत्यांच्या अक्षरशः उड्या पडतील. या कलेक्शनमध्ये बाजारात सर्वाधिक मागणी असलेला एक विशेष पीस ‘ऑल हॉलो ईव’ पेअर, देखील असणार आहे.

फिटनेसप्रेमी आणि खेळांची चाहती असल्यामुळे दीपिकाने नेहमीच आपल्या चाहत्यांना स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी प्रेरित केले आहे. या संस्करणाच्या निमित्ताने, दीपिका तिच्या चाहत्यांना स्वस्थ जीवन जगण्याचा मार्ग आणि निरोगी आरोग्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोण स्वीकारण्यासाठी प्रेरित करणार आहे. हे कलेक्शन २९ ऑगस्टपासून DeepikaPadukone.com/Closet वर उपलब्ध होणार आहे.