दीपिका पदुकोण चित्रपटाच्या शुटिंग आधी पूर्ण करणार आपल्या सर्व ब्रँड कमिटमेंट

मुंबई : देशाने हळूहळू लॉकडाउन अनलॉक करण्यास सुरवात केली आहे, त्यामुळे दीपिका पादुकोणसुद्धा इतर काही कलाकारांप्रमाणेच ‘न्यू नॉर्मल’ स्वीकारत आहे आणि सर्व आवश्यक खबरदारी घेत शुटिंगला सुरूवात करणार आहे. चित्रपटांसोबतच दीपिका बर्‍याच नामांकित ब्रॅण्ड्ससोबत वर्षानुवर्षे संबंधित असून लॉकडाऊनमध्ये दीपिकाने आणखी एका मोठ्या ब्रँडसोबत करार केला आहे.

शकुन बत्राच्या पुढील चित्रपटाच्या शुटिंगसाठी दीपिका लवकरच गोव्याला रवाना होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करण्यापूर्वी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “कोविड -१९ मुळे अडकलेल्या ब्रँडच्या कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी दीपिकाने सुरुवातीचे तीन दिवस राखीव ठेवले आहेत. जेव्हा अभिनेत्री तिच्या चित्रपटाचे शुटिंग सुरूवात करेल तेव्हा तिला यासाठी वेळ मिळणार नाही आणि म्हणूनच ती हे सर्व सुरुवातीच्या दिवसात पूर्ण करणार आहे.”

आगामी प्रकल्पांविषयी बोलायचे झाल्यास दीपिकाकडे शकुन बत्राचा चित्रपट आहे तसेच ‘इंटर्न’ चा रिमेक आणि प्रभाससोबतचा चित्रपट असून तो नाग अश्विन दिग्दर्शित करत असलेला पॅन इंडिया बहुभाषिक प्रोजेक्ट आहे आणि यासोबतच द्रौपदी या आणखी एका चित्रपटात देखील ती दिसणार आहे.