दीपिकाचे वडील माजी बॅडमिंटन चॅम्पियन प्रकाश पदुकोण रुग्णालयात दाखल, संपूर्ण कुटुंबाला झाली कोरोनाची लागण!

बंगळुरूच्या महावीर जैन रुग्णालयात प्रकाश पदुकोण यांना दाखल करण्यात आल्याच समजतय. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.

    क्रीडा विश्वातील अनेक कलाकार, खेळाडू कोरोनाग्रस्त होत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे IPL 2021 सुद्धा मध्येच रद्द करावी लागली. तर आता आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे वडील आणि माजी बॅडमिंटन चॅम्पियन असलेले वडील प्रकाश पदुकोण यांना कोरोनाची लागण झाली आहे.  प्रकाश पदुकोण यांना बंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दीपिकाची आई आणि बहीणही कोरोनाग्रस्त आहेत. पण त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

    बंगळुरूच्या महावीर जैन रुग्णालयात प्रकाश पदुकोण यांना दाखल करण्यात आल्याच समजतय. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.

    प्रकाश पदुकोण यांनी त्यांच्या बॅटमिंटन कारकीर्दीत प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. जागतिक क्रमवारीत ते अग्रस्थानीही होते. कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्यांनी भारतासाठी पदक जिंकलं होतं.