Deepika, Sara, Shraddha refuse to take drugs,

तिन्ही अभिनेत्रींनी एनसीबीसमोर ड्रग्स घेण्यास नकार दिला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित मादक पदार्थांच्या प्रकरणात सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची विधाने नोंदवली गेली आहेत. दक्षिण मुंबईतील बल्लार्ड इस्टेट येथील एनसीबीच्या प्रादेशिक कार्यालयात श्रद्धा आणि साराची चौकशी करण्यात आली.

मुंबई: शनिवारी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika), सारा अली खान  (Sara) आणि श्रद्धा कपूर (Shraddha) यांच्याशी लांबलचक चौकशी केली. एनसीबीने (NCB) म्हटले आहे की आता ते वस्तुस्थितीची चौकशी करतील आणि पुढील तपासाची दिशा ठरवतील. सूत्रांच्या माहितीनुसार तिन्ही अभिनेत्रींनी एनसीबीसमोर ड्रग्स घेण्यास नकार दिला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित मादक पदार्थांच्या (drugs) प्रकरणात सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची विधाने नोंदवली गेली आहेत. दक्षिण मुंबईतील बल्लार्ड इस्टेट येथील एनसीबीच्या प्रादेशिक कार्यालयात श्रद्धा आणि साराची चौकशी करण्यात आली.

दीपिकाची सुमारे ५.३० तास चौकशी केली गेली

अभिनेत्री दीपिका पादुकोणची एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये चौकशी केली गेली आणि तीसुद्धा तिचे निवेदन नोंदवून घरी पोहोचली. मिळालेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री दीपिका आपल्या घरातून हॉटेलमध्ये शिफ्ट झाली आणि तिथून सकाळी दहाच्या सुमारास ती एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. दीपिकाची सुमारे ५:३० तास चौकशी केली गेली. दरम्यान, तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचीही चौकशी केली गेली. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिका आणि करिश्मा यांना समोरासमोरही प्रश्न विचारण्यात आले. दीपिकाला व्हॉट्सॲप ग्रुपबद्दलही विचारण्यात आले ज्यामध्ये ड्रग्जची चर्चा होती. दीपिका या ग्रुपची ॲडमीन होती.

श्रद्धाबरोबर ६ तासांची चौकशी, साडेचार तास साराचे प्रश्न व उत्तरे

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वक्तव्य नोंदवण्यासाठी दुपारी १२ वाजता श्रद्धा कपूर आणि त्यानंतर साधारण एक तासाच्या नंतर सारा एनसीबीच्या क्षेत्रीय कार्यालयात पोहोचली. ते म्हणाले की, साराचे वक्तव्य सुमारे साडेचार तास नोंदवले गेले होते. आणि सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. जया साहामार्फत सीबीडी ऑईल मागितल्याची कबुली तिने दिली. मात्र ते सेवन केले नाही. अंग दुखत असल्याने ते मागवल्याचे सांगितले. या अधिकाऱ्याने सांगितले की श्रद्धा सहा तासांच्या चौकशीनंतर संध्याकाळी ५.५५ वाजता कार्यालयातून बाहेर पडली. दोन्ही अभिनेत्रींनी राजपूतसोबत चित्रपटात काम केले आहेय.

सुशांत ड्रग्ज घेताना दिसला – श्रद्धा

रिपोर्ट्सनुसार एनसीबीने श्रद्धा कपूरला विचारपूस केली आणि सुशांतच्या ‘छिचोर’ चित्रपटाविषयी तिला प्रश्न विचारला. श्रद्धा कपूरने चौकशी दरम्यान सांगितले की, तिने ‘छिचोरे’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार श्रद्धाने चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी सुशांतच्या फार्म हाऊसला भेट दिली आहे. एनसीबीला समजले की या पार्टीत ड्रग्स वापरली जात होती. मात्र, एनसीबी चौकशीत श्रद्धाने स्वतः ड्रग्सचा कोणताही वापर करण्यास नकार दिला.

सुशांत घेत असे शूटिंगवेळी गांजा – सारा

सारा खान दुपारी एक वाजता एनसीबी कार्यालयात पोहचली. तिच्याकडे सुशांतसिंहबद्दल, त्याच्या व्यसनाबद्दल, केदारनाथ चित्रपट व थायलंड ट्रिपबद्दल माहिती विचारण्यात आली. शुटिंगच्यावेळी सुशांतसिंह गांजा, चरस घेत होता, सेटवर बहुतांश जणांना त्याबद्दल माहिती होती. आपण मात्र कधीही त्याचे सेवन केले नाही. तसेच कोणत्याही ड्रग तस्कराला आपण ओळखत नसल्याची माहिती तिने दिली असल्याचे सांगितले. तिचा चालक रईसच्या ड्रग्ज सेवनाबद्दलचा आरोप तिने फेटाळून लावल्याचे सांगण्यात आले. तिला साडेपाचच्या सुमारास कार्यालयातून सोडण्यात आले.