devdatta.g nage

लकी अली या सुप्रसिद्ध गायकाची गाणी सदाबहार आहेत. ती गाणी ऐकून सगळ्यांना मंत्रमुग्ध व्हायला होतं. सध्या लकी अलीचे अनप्लग गाण्यांचे व्हिडीओज देखील व्हायरल होतं आहेत. झी युवा वरील प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम 'डॉक्टर डॉन' सगळ्यांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या सेटवर कलाकार ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन देखील खूप धमाल करत असतात. नुकतंच या मालिकेच्या सेटवरील बिहाइंड द सिन व्हिडीओ देवदत्तने शेअर केला आहे ज्यात मालिकेच्या शूटींगदरम्यान ब्रेकटाईममध्ये देवदत्त त्याचे छंद जोपासताना दिसतोय.

लकी अली या सुप्रसिद्ध गायकाची गाणी सदाबहार आहेत. ती गाणी ऐकून सगळ्यांना मंत्रमुग्ध व्हायला होतं. सध्या लकी अलीचे अनप्लग गाण्यांचे व्हिडीओज देखील व्हायरल होतं आहेत. झी युवा वरील प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम ‘डॉक्टर डॉन’ सगळ्यांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या सेटवर कलाकार ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन देखील खूप धमाल करत असतात. नुकतंच या मालिकेच्या सेटवरील बिहाइंड द सिन व्हिडीओ देवदत्तने शेअर केला आहे ज्यात मालिकेच्या शूटींगदरम्यान ब्रेकटाईममध्ये देवदत्त त्याचे छंद जोपासताना दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devdatta G Nage (@devdatta.g.nage)

देवदत्त गिटारवर लकी अलीचं गाणं वाजवतोय आणि सर्व कलाकारांची मैफिल जमली आहे. बाकीचे कलाकार त्याच्या गाण्याला साथ देत आहेत तर देवा गिटार वाजवून माहोल बनवतोय. उत्तम अभिनय कौशल्यासोबत देवदत्त म्युजिकमध्ये देखील निपुण आहे. तो अनेक वाद्य वाजवू शकतो. डॉक्टर डॉनच्या सेटवर जमलेल्या या मैफिलीचा प्रेक्षक आणि चाहते देखील पुरेपूर आस्वाद घेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devdatta G Nage (@devdatta.g.nage)

देवदत्तच्या चाहत्यांनाही त्याचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. गायक लकी अलीसाठी देवदत्तने हा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये देवदत्त लिहीतो की, “तुमच्यावर प्रेम आहे लकी अली.. दीर्घ आयुष्य जगा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Devdatta G Nage (@devdatta.g.nage)