विरोधीपक्षनेत्यांची पुढची गोष्ट… राजकारणात रंगलेल्या नाट्यमय घटनांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची खऱ्या नाटकाला हजेरी!

'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आजरवर सर्व प्रयोगांना रसिकांनी चांगला प्रतिसाद देत कायम गर्दी केली. प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांची या नाटकातील केमिस्ट्री चाहत्यासाठी कायमच पर्वणी ठरली आहे.

    सध्या राजकारणात विविध विषय चांगलेच तापले आहेत. म ते मराठा आरक्षण असो वा किंवा वाझे यांची अटक असो. या सगळ्याप्रकरणात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. राजकारणात एवढ्या नाट्यमय गोष्टी घडत असताना देवेंद्र फडणवीस यांना खरखुरं नाटक बघायचा मोह आवरला नाही, बालगंधर्व रंगमंदिर इथं नुकताच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा ४०० वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रयोगाला हजेरी लावली होती.

    सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांच्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांनी संपूर्ण टीमशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रयोग संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि प्रशांत दामले यांच्यात चांगल्याचं गप्पाही रंगल्या. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत दामलेसह त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं.

    ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आजरवर सर्व प्रयोगांना रसिकांनी चांगला प्रतिसाद देत कायम गर्दी केली. प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांची या नाटकातील केमिस्ट्री चाहत्यासाठी कायमच पर्वणी ठरली आहे. लॉकडाउननंतरही या नाटकाला चाहत्यांनी गर्दी केली.