डॉक्टरची अटक टळणार, डिंपल दिव्याच्या तावडीतून पुन्हा देविसिंगला सोडवणार, मालिकेत पुन्हा ट्विस्ट!

दरम्यान दिव्याचं हे रुप पाहून सगळेच हैराण झाले आहेत. डॉक्टरला केलेल्या या मारहाणीमुळे गावातील लोकांना मोठा धक्का ही बसला आहे.

    झी मराठी वरील लोकप्रिय तसेच बहुचर्चित मालिका ‘देवमाणूस’ सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. दिव्या देवी सिंगला अटक करायला त्याच्या लग्नात आली आहे. डॉक्टरने डिम्पलला त्याने केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ते दोघेही आता लग्न करून लवकरात लवकर कातळवाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

    दरम्यान दिव्याचं हे रुप पाहून सगळेच हैराण झाले आहेत. डॉक्टरला केलेल्या या मारहाणीमुळे गावातील लोकांना मोठा धक्का ही बसला आहे. तेव्हा आता दिव्या खरच डॉक्टरला अटक करू शकणार का असा प्रश्न होत आहे. याशिवाय अनेकदा डिम्पलने डॉक्टरची साथ दिली आहे. व त्याला पोलिसांच्या तावडीतून सोडवलं आहे. त्यामुळे यावेळीही डिम्पल काही शक्कल लढवणार तर नाही ना हे पाहण औत्सुक्याचं ठरेल.

    देवी सिंगचं खरं रुप समोर आल्यानंतर मालिका संपणार असं प्रेक्षकांना वाटलं होतं. मात्र आता पुढे सुरुच राहणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता मालिका काय वळण घेणार पाहंण रंजक ठरेल.