लग्नात दिव्या खोडा घालणार की सरू आज्जी राडा करणार? देवमाणूस – एक रंजक मर्डर मिस्ट्री!

आता ही मालिका एका निर्णायक टप्प्यावर आली आहे, आता जसं डिम्पल आणि अजित ह्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे, तसंच या लग्नात दिव्या खोडा घालणार की सरू आज्जी राडा करणार?

  एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका देवमाणूस. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत ‘किरण गायकवाड’ याने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिकली आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  आता ही मालिका एका निर्णायक टप्प्यावर आली आहे, आता जसं डिम्पल आणि अजित ह्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे, तसंच या लग्नात दिव्या खोडा घालणार की सरू आज्जी राडा करणार? डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग सोबत डिम्पल ला सुद्धा अटक होणार का? ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांच्या उत्तराची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय.

  २ तासांचा विशेष भागात ही रंजक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आजवर अजित ने केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली तो डिम्पल कडे देणार आहे.