Shankar

‘देवों के देव महादेव’(Devon Ke Dev Mahadev Serial On Shemaroo TV) ही मालिका प्रेक्षकांना शेमारू टीव्ही वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

    भगवान शंकराचे(Lord shankar) लाखो भक्त जगभर आहेत. आपल्या आराध्य दैवताचा महिमा मालिकेच्या माध्यमातून पहाणं ही भक्तांसाठी जणू एक पर्वणीच असते. आता ‘देवों के देव महादेव’(Devon Ke Dev Mahadev Serial On Shemaroo TV) ही मालिका प्रेक्षकांना शेमारू टीव्ही वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

    प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीमुळं ‘देवों के देव महादेव’ ही मालिका शेमारूवर दाखवण्यात येणार असल्याचं वाहिनीच्या वतीनं सांगण्यात येत आहे. एका संन्याशापासून ते आदिशक्ती देवी सतीसोबतचं प्रेम आणि विरह, पार्वतीच्या रूपात देवी सतीचा पुनर्जन्म आणि शंकर-पार्वतीच्या विवाहांसोबतच इतरही रम्य कथा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. याखेरीज पुराणातील काही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा या मालिकेत प्रेक्षकांना दर्शन देणार असून, त्या अनुषंगानं येणाऱ्या रंजक कथाही प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.

    पुराणातील व्यक्तिरेखांचं भगवान शंकारांसोबतचं नातंही या मालिकेत अत्यंत सुरेखरीत्या अधोरेखीत करण्यात आलं आहे. मोहित रैना, मौनी रॉय, सोनारिका भदौरिया आणि सौरभ राज जैन या तगड्या कलाकारांचा अभिनय निश्चितच रसिकांवर मोहिनी घालण्याचं काम करेल.