choreographer dharmesh

धर्मेश सर हे नृत्यविश्वातील एक प्रख्यात नाव. चित्रपट, डान्स शोज करत आज धर्मेश सर नृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचला आहे.  नृत्य कलाकारांसाठी ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा कार्यक्रम सुरु होत आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून धर्मेश सर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

धर्मेश(dharmesh) सर हे नृत्यविश्वातील एक प्रख्यात नाव. आपल्या नृत्याने धर्मेश एका शोमधून प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्याने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. चित्रपट, डान्स शोज करत आज धर्मेश सर नृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचला आहे.  नृत्य कलाकारांसाठी ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’(maharashtras best dancer) हा कार्यक्रम सुरु होत आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून धर्मेश सर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.


या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या असून सोनी लिव्ह या ॲपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हीडिओज पाठवायचे आहेत. ऑडिशन पाठवण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२० आहे. आता ऑडिशन प्रक्रिया सुरू असून लवकरच निवडलेले स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.