बॉलिवूड दिग्दर्शकांनी नाकारलं पण मराठी माणासाने स्विकारलं, कार्तिक आर्यन झळकणार ‘या’ चित्रपटात!

या चित्रपटात बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस करणार असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे.

    मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आजवर अनेक चित्रपट केले आहेत. आता समीर विद्वांस बॉलिवूड चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे समीरने या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे.

    समीर विद्वांसचा लवकरच ‘सत्यनारायण की कथा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा समीरने नुकताच ट्विटरद्वारे केली आहे. ‘एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या’ असे समीरने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

     

    या चित्रपटात बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस करणार असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे. हा चित्रपट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    समीरने ‘धुरळा’, ‘डबल सीट’, ‘टाइम प्लीज’ आणि ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच समीरची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘समांतर २’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.