अभिनेत्री दिया मिर्झाने दोन महिन्यांपूर्वीच दिला बाळाला जन्म, अद्याप बाळ आहे हॉस्पिटलमध्ये कारण…

बेबी बंप सोबत फोटो शेअर करत दिया मिर्झाने ती गरोदर असल्याची माहिती सोशल मीडिया वरून दिली होती. पती वैभव रेखीसोबत लग्न गाठ बांधण्याआधीच दिया गरोदर असल्यामुळे सोशल मीडिया वरून तिच्यावर टीका करण्यात आली होती.

    अभिनेत्री दिया मिर्झाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालंय. दियाने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत मुलाच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय. खरं तर दियाने १४ मेला म्हणजेच दोन महिन्यांपूर्वाच मुलाला जन्म दिला आहे. दियाचं बाळ प्रीमँच्युअर म्हणजे वेळे आधीच जन्माला आलं होतं. त्यानंतर दोन महिन्यांपासून ते आयसीयूमध्ये आहे.

    दिया आणि वैभवने त्यांच्या मुलाचं नाव अव्यान आझाद रेखी असं ठेवलं आहे. दियाने तिच्या पोस्टची सुरुवात एलिजाबेथ स्टोन यांच्या काही ओळींनी केलीय. ती म्हणाली ” आमचं काळीज असेल्या आमच्या मुलाचा अव्यान आझादचा जन्म १४ मेला झालाय. तो लवकर आला. त्यानंतर आमचा हा चिमुकला नवजात मुलगा आयसीयूमध्ये नर्स आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. मला गरोदरपणात अचानक अ‍ॅपेंडेक्टॉमी आणि गंभीररित्या बॅक्टेरियल इंफेक्शन झालं. हे जीवघेणं ठरू शकलं असतं. नशीबाने आमच्या डॉक्टरांनी वेळेत काळजी घेत सी-सेक्शन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाळाचा सुरक्षितरीत्या जन्म होवू शकला.” असं दियाने सांगितलं.

    बेबी बंप सोबत फोटो शेअर करत दिया मिर्झाने ती गरोदर असल्याची माहिती सोशल मीडिया वरून दिली होती. पती वैभव रेखीसोबत लग्न गाठ बांधण्याआधीच दिया गरोदर असल्यामुळे सोशल मीडिया वरून तिच्यावर टीका करण्यात आली होती.