दिया मिर्झाने साजरा केला सावत्र मुलीचा वाढदिवस, नवऱ्याची EX बायकोही होती हजर!

वैभव रेखीची पहिली पत्नी सुनैनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलीचा वाढदिवस साजरा करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘कुटुंब’ असे कॅप्शन सुनैनाने दिले आहे. तसेच या पोस्टमध्ये दिया मिर्झा, वैभव रेखी यांना टॅग केला आहे.

    बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी वैभव रेखीशी लग्न केले. त्यानंतर दिया वैभव रेखी आणि सावत्र मुलगी समायरासोबत मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेत होती. आता दियाने सावत्र मुलगी समायराचा वाढदिवस साजरा केला असल्याचे समोर आले आहे. वाढदिवस साजरा करतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण यावेळी वैभव रेखीची पहिली पत्नी ही उपस्थित होती.

    वैभव रेखीची पहिली पत्नी सुनैनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलीचा वाढदिवस साजरा करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘कुटुंब’ असे कॅप्शन सुनैनाने दिले आहे. तसेच या पोस्टमध्ये दिया मिर्झा, वैभव रेखी यांना टॅग केला आहे.

    समायराचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. समायराचे वडील वैभव तिच्यासोबत असल्याचे दिसत आहे. केक कापताना दिया समोर उभी असल्याचे दिसत आहे. वैभवचे हे दुसरे लग्न आहे. त्याची पहिली पत्नी सुनैना ही योगा आणि लाइफस्टाइल कोच आहे. तिने वैभव आणि दियाला लग्नानंतर शुभेच्छा दिल्या होत्या.