‘सडक २’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी दिली धडक ?

१९९२ साली गाजलेल्या सडक या हिंदी चित्रपटाचा सडक २ हा रिमेक आहे. सडक या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री पूजा भट्ट आहे. सडक २ या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट आहेत. तर संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.

 मल्टीस्टार संजय दत्त, आलीया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांचा ‘सडक २’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मंगळवारी ११ ऑगस्ट रोजी सडक २ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली आहे. १ दिवसात २१ लाख प्रेक्षकांनी सडक २ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला असता, या ट्रेलरला प्रेक्षकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यूट्यूबवर लाईक(like) एवजी डिसलाईक(dislike) जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर १ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी या कॉमेंट्स सुदधा केल्या आहेत. १९९२ साली गाजलेल्या ‘सडक’ या हिंदी चित्रपटाचा सडक २ हा रिमेक आहे. ‘सडक’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री पूजा भट्ट आहे. सडक २ या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट आहेत. तर संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.

सडक २ या चित्रपटाला नकारार्थी प्रतिसाद का ?

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडसह अनेक लोकांनी नेपोटिझमला विरोध केला आहे. आलिया भट्ट सुद्धा नेपोटिझमच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळेच सडक २ या चित्रपटाच्या ट्रेलरवर अनेक प्रेक्षकांकडून टीकेची झड होत असून तब्बल ५० टक्के लोकांनी या ट्रेलरला डिसलाईक(dislike) केलं आहे. त्यामुळे आता या चित्रपटाचं नक्की काय होणार ? असा प्रश्न हॉटस्टार या वितरक कंपनीला पडला असल्याची शक्यता आहे.