रामायणातील सीता आधी करायची बी- ग्रेड चित्रपटांमध्ये काम, जूने फोटो बघून आश्चर्य वाटेल!

दीपिकाला सीताचा रोम मिळवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली होती. जवळपास २५ लोकांनी यासाठी स्क्रीनटेस्ट दिल्या होत्या. यावेळी ज्याचे चेह-याचे हावभाव.

    रामायण या पौराणिक मालिकेत सीतेची भूमिका केलेल्या दीपिका चिखलियांना प्रचंड पसंती मिळाली. दीपिका चिखलिया यांनी वयाच्या १४ वर्षापासून कामाला सुरूवात केली. जीपिका जाहीरातीत झळकल्या होत्या. दीपिका यांच्या वडीलांना त्यांचे अभिनय क्षेत्रात काम करणे अजिबात पसंत नव्हते. पण दीपिकाच्या आईचा या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. दीपिकाला जेव्हा रामायणची ऑफर मिळाली तेव्हा त्या केवळ १६ वर्षाच्या होत्या.

    दीपिकाला सीताचा रोम मिळवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली होती. जवळपास २५ लोकांनी यासाठी स्क्रीनटेस्ट दिल्या होत्या. यावेळी ज्याचे चेह-याचे हावभाव. संवाद कौशल्य यार बारकाईने लक्ष देण्यात आले होते. यासगळ्यांमध्ये दीपिकाने दिलेली टेस्ट पसंतीस उतरली आणि सीतासाठी त्यांचे नाव सिलेक्ट करण्यात आले.

    दीपिका यांनी ‘रामायण’ मालिकेत झळकण्याआधी अनेक सिनेमांतही काम केली आहेत. ‘भगवान दादा’ (१९८६), ‘रात के अंधेर में’ (१९८७), ‘खुदाई’ (१९९४), ‘सुन मेरी लैला’ (१९८५), ‘चीख’ (१९८६), ‘आशा ओ भालोबाशा’ (बंगाली, १९८९) आणि ‘नांगल’ (तमिल, १९९२) अभिनेत्री म्हणून त्या झळकल्या. मात्र सिनेमांतून त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. यामधले काही सिनेमे तर ब्री-गेड होते.