केवळ सुशांतसाठी अंकिताने दोन मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या, अनेक वर्षांनी केला अखेर खुलासा!

एका मुलाखतीत बोलताना अंकितानं सांगितलं, की तिनं शाहरुख खानच्या हॅप्पी न्यू ईअर तसंच संजय लिला भन्साळीद्वारा दिग्दर्शित बाजीराव मस्तानी आणि गोलियों की रासलीला या सिनेमांना केवळ सुशांतमुळे नकार दिला.

  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता जवळपास नऊ महिने होऊन गेले आहेत. मात्र, आजही सुशांतच्या आठवणी त्यांच्या मनात ताज्या आहेत. सुशांतच्या निधनाचं सर्वाधिक दुख: त्याच्या कुटुंबा इतकच अंकिता लोखंडेलाही झालं आहे. अंकिता आणि सुशांतचा अनेक वर्षांपूर्वीच ब्रेकअप झाला असला तरीही अभिनेत्री त्याच्या आठवणीत आजही भावूक होते. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीनं सुशांतसोबतच्या आपल्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

  अंकिता मुलाखतीत म्हणाली…

  एका मुलाखतीत बोलताना अंकितानं सांगितलं, की तिनं शाहरुख खानच्या हॅप्पी न्यू ईअर तसंच संजय लिला भन्साळीद्वारा दिग्दर्शित बाजीराव मस्तानी आणि गोलियों की रासलीला या सिनेमांना केवळ सुशांतमुळे नकार दिला. कारण तिची अशी इच्छा होती की आधी सुशांतचं काहीतरी चांगलं व्हावं. मी हॅप्पी न्यू ईअर सिनेमाची ऑफरही नाकारली. अंकिता म्हणाली, मला आजही आठवतं जेव्हा फराह मॅमनं मला या सिनेमाची ऑफर दिली तेव्हा एका कामानिमित्त मी शाहरुख सरांना भेटले. या भेटीदरम्यान शाहरुख खाननं मला सांगितलं, की मी तुला बेस्ट डेब्यू देण्याचा प्रयत्न करेल. मात्र, मी नेहमी प्रार्थना करत राहिले की माझं चांगलं होऊ न होऊ पण त्याचं चांगलं होऊ दे. एक मुलगी नेहमी आपल्या जोडीदाराचं चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

  मात्र, सात वर्ष रिलेशनशिपमध्ये राहूनही सुशांत आणि अंकिता एकमेकांचे होऊ शकले नाहीत आणि त्यांचा ब्रेकअप झाला. अंकितानं मणिकर्णिका या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा सुशांतनं अतिशय प्रेमानं तिचं अभिनंदन केलं होतं.