सुशांतचा शेवटचा चित्रपट पुढच्या महिन्यात होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या धक्क्यातून अजुनही अनेकजण सावरलेले नाहीत. त्याचे फोटो, व्हिडिओ इत्यादीच्या माध्यमातून सुशांतच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न त्याचे चाहते करत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या धक्क्यातून अजुनही अनेकजण सावरलेले नाहीत. त्याचे फोटो, व्हिडिओ इत्यादीच्या माध्यमातून सुशांतच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न त्याचे चाहते करत आहेत. सुशांतच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट कधी रिलीज होणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. सुशांतच्या ‘दिल बेचारा’ या अखेरच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. तरण आदर्श यांनी २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

तरण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टारवर २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन नसलेल्या प्रेक्षकांनाही हा चित्रपट पाहता येणार आहे.

‘दिल बेचारा’ य चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केले आहे. तसेच सुशांतसोबत संजना सांघी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. संजनाचा हा पहिलाच चित्रपट असल्याचे समजते. हा चित्रपट जॉन ग्रीक यांनी लिहीलेल्या  ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित आहे. खरेतर ‘दिल बेचारा’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करू नका, मोठ्या पडद्यावर प्रदशिंत करा अशी मागणी होती. पण ती मान्य न झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ‘दिल बेचारा’ चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.