‘दिल बेचारा’ चित्रपट न्यूझीलंडमधील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ २४ जुलैला डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २४ तासांमध्ये साडेनऊ कोटी लोकांनी हा चित्रपट बघितला.  कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ‘दिल बेचारा’ हा चित्रपट चित्रपटगृहांऐवजी डिझनी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावा लागला होता. आता हा चित्रपट न्यूझीलंडमधल्या एका चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

न्यूझीलंडमधल्या हिंदी रेडिओ चॅनेल ऑकलंडमधल्या होयत्स चित्रपटगृहामध्ये ‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच यावेळी तेथील चाहत्यांकडून सुशांतला श्रद्धांजलीदेखील वाहण्यात आली.

‘दिल बेचारा’ या चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूत सोबत संजना सांघीने काम केले आहे. ‘दिल बेचारा’ हा चित्रपट म्हणजे २०१४ साली आलेल्या ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ या हॉलिवूडमधील चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जॉन ग्रीन यांचे ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ या नावाचे पुस्तक आहे. त्यावर हा चित्रपट आधारित होता.