सध्या सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत त्या अभिनेत्रीला ओळखणही कठीण झालं आहे. दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेतील ‘निशा’ आठवतेय का? राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच मंजिरी पुपालाचा हा फोटो आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने मंजिरीने हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

View this post on Instagram
मंजिरीने तिच्या पूर्ण चेहऱ्याला आणि अंगाला हा केक लावला आहे. या फोटोल तीने झक्कास कॅप्शनही दिलं आहे. ‘केक आणि सेलिब्रेशनचा सध्या माहौल असल्याने, तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी हा फोटो अतिशय योग्य वाटतोय’, असं म्हणत तिने हा फोटो पोस्ट केला. मंजिरीने तिच्या पूर्ण चेहऱ्याला आणि अंगाला हा केक लावला आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय.
मंजिरीच्या या फोटोवर ‘भाडिपा’ फेम सारंग साठ्येनेही कमेंट केली आहे. ‘कॉलेजमध्ये प्रत्येक वाढदिवसाला मला असा केक फासला जायचा. कॉलेजमधली पोरं पैसे जमा करून केक आणायचे आणि तो चेहऱ्याला फासायचे’, अशी आठवण सारंगने सांगितली. तर अनेकांनी मंजिरीचे वेडेचाळे असल्याचेही म्हटलं आहे.
यापूर्वी मंजिरीने हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले असून, ‘ग्रहण’ मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. मंजिरीने स्टार प्लस वाहिनीवरील ‘इश्कबाज’ या मालिकेत एसीपी अदिती देशमुखची भूमिका साकारली होती.