dilip kumar get emotional after seeing ancestral house
पेशावरमधील वडिलोपार्जित घराचे फोटो शेअर करत दिलीप कुमार झाले भावुक

पाकिस्तानमधील सरकारच्या या निर्णयानंतर दिलीप कुमार यांनी त्यांच्या वडिलोपार्जित घराचे काही फोटो शेअर केले असून ते भावुक झाले आहेत.

मुंबई : पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वा सरकारनं (government) बॉलिवूड शोमॅन राज कपूर (rajkapoor) आणि ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांची वडिलोपार्जित घरे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्यासह फाळणीपूर्वीची अनेक घरं खरेदी करून पाकिस्तान सरकारला राष्ट्रीय वारसा घोषित करायचा आहे. पाकिस्तानमधील सरकारच्या या निर्णयानंतर दिलीप कुमार यांनी त्यांच्या वडिलोपार्जित घराचे काही फोटो शेअर केले असून ते भावुक झाले आहेत.

दिलीप कुमार यांचं वडिलोपार्जित घर पेशावरच्या प्रसिद्ध किस्सा खवानी बाजारात आहे. या घराच्या आठवणींमध्ये दिलीप कुमार भावूक झाले असून त्यांनी पाकिस्तानी नागरिकांना एक विनंतीदेखील केली आहे.

 

“हे फोटो शेअर केल्याबद्दल मनापासून आभार. पेशावर येथे राहणाऱ्या नागरिकांना माझी एक विनंती आहे. माझ्या या वडिलोपार्जित घराचे काही फोटो तुमच्याकडे असतील तर मला नक्की पाठवा”, असं ट्विट दिलीप कुमार यांनी केलं आहे.

दरम्यान, दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित घराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जर त्यांची पुढील काळजी घेतली गेली नाही, तर ती इमारत मोडकळीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला संरक्षण देण्यासाठी पाकिस्तान सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. “जेव्हा जेव्हा पाकिस्तान सरकारनं दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित हवेलीला संग्रहालयात रूपांतरित करण्याचा विचार केला तेव्हा मला खूप आनंद झाला. सरकारच्या या निर्णयाचे मी नेहमीच कौतुक करते. या वेळी हे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा आहे,” अशी प्रतिक्रिया सायरा बानो यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलाताना दिली.