dilip kumar get emotional after seeing ancestral house

दिलीप कुमार यांनी रुग्णालयातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

    ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलय. त्यांच्या प्रकृती संदर्भातली एक मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता त्यांना व्हेंटिलेटरवर नाही तर ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.

    दरम्यान दिलीप कुमार यांनी रुग्णालयातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोद्वारे त्यांनी आपण तंदुरुस्त आहोत अन् लवकरच घरी परत येऊ असं आश्वासन चाहत्यांना दिलं आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

     

    दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी देखील एक पोस्ट शेअर करुन सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या, “गेल्या काही दिवसांपासून दिलीप साहेब आजारी होते. त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेमुळंच दिलीप साहेब पुन्हा एकदा ठणठणीत बरे होऊन घरी परतणार आहेत. सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या.” अशा आशयाची पोस्ट लिहून सायरा बानो यांनी चाहत्यांचे आभार मानले.