dilip kumar

यापूर्वी मे महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नेहमीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते.

    बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे सकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी दिलीय कुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

    दिलीप कुमार यांच्या प्रकृती विषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘दिलीप साहब यांची प्रकृती थोडी बिघडली होती. त्यामुळे आम्ही खार येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांना घेऊन गेलो. हे एक नॉन कोविड रुग्णालय आहे. इथे आम्ही चेकअप करण्यासाठी आलो होतो. तसेच दिलीप कुमार यांची प्रकृती का बघडली आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. हे रुग्णालय नॉन कोविड आहे आणि त्यांना कोरोना झालेला नाही. आम्ही लवकरच घरी परत जाऊ.

    यापूर्वी मे महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नेहमीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते.