diljit- kangana

कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच आंदोलन तीव्र होऊ लागलय तर दुसरीकडे या आंदोलनावर सुरू असणार अभिनेत्री कंगना रणावत आणि अभिनेता दिलजित दोसांज यांच्यातील ट्वीटरवॉर थांबण्याचं नाव घेत नाहीये. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने कंगनाने दिलजित व प्रियांका चोप्रावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने ट्विट करत दिलजितला डिवचलं.

काय म्हणाली कंगना

कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज हैदराबादमध्ये बारातास काम केल्यानंतर संध्याकाळी मी चेन्नईमध्ये एका कार्यक्रमासाठी जाणार आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मी कशी दिसतेय?असं ट्विट करत ‘दिलजित कित्थे आ’ (दिलजित कुठे आहे) हा हॅशटॅग तिने जोडला. ट्विटरवर प्रत्येकजण त्याला शोधत आहे, असं ती पुढे म्हणाली.

कंगनाच्या या ट्विटला दिलजितनेही त्याच्या खास अंदाजात उत्तर दिलय. ट्वीटला उत्तर देताना दिलजितने त्याचं दिवसभराचं वेळापत्रकच सांगितलं. ‘सकाळी उठल्यानंतर मी जिममध्ये व्यायाम केला. त्यानंतर दिवसभर काम आणि मग रात्री झोपी गेलो’, असं उपरोधिक ट्विट त्याने केलं.

कंगनाने सुनावलं

प्रिय दिलजीत आणि प्रियांका.. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल किंवा तुम्ही तुमच्या आईंचा आदर करत असाल तर हा कृषी कायदा नक्की काय आहे ते एकदा जाणून घ्या. तुम्हाला शेतकऱ्यांचा वापर करून देशद्रोह्यांच्या गुड बुक्समध्ये यायचं आहे का?, असं ट्विट कंगनानं केलं होतं.