‘अवतार’ च्या सिक्वेलच्या शूटींगसाठी दिग्दर्शक आणि निर्माता पोहोचले न्यूझीलंडमध्ये

वेलिंग्टन: ‘अवतार’ चित्रपटाच्या सिक्वेलच्या शूटींगसाठी दिग्दर्शक जेम्स कॅमेरून आणि निर्माता जॉन लाँदो आपल्या ५० जणांच्या टीमसह न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे आले आहेत. लाँदो यांनी इन्स्टाग्रामच्या पोस्टद्वारे ही माहीती दिली आहे. तिथल्या सरकारच्या नियमांनुसार सगळं काम करणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लाँदो यांनी कॅमेरूनसोबतचा विमानतळावरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी मास्क आणि फेस शिल्ड घातल्याचे दिसत आहे. लॉस एंजलिसवरून ते चार्टर्ड विमानाने न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे रविवारी पोहोचले आहेत.

मार्चमध्ये अवतारच्या सिक्वेलचे शूटींग कोरोनामुळे थांबवावे लागले होते. आता ते पुन्हा सुरु होणार आहे.