तालिबानची भारतीय दिग्दर्शकाला जीवे मारण्याची धमकी, शेअर केला धक्कादायक अनुभव!

अनेकांनी जूने अनुभव शेअर केले आहेत. बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान यांनी देखील एक भयानक अनुभव सांगितला आहे.

    अफगणिस्तानावर  तालिब्यांनी ताबा मिळल्यापासून संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानील घडामोडींकडे आहे. तब्बल २० वर्षांनंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात दहशत माजवत आहेत. अनेक देशातून सेलिब्रेटींनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केलीये. अनेकांनी जूने अनुभव शेअर केले आहेत. बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान यांनी देखील एक भयानक अनुभव सांगितला आहे.

    २००६ मध्ये आला अनुभव

    २००६ मध्ये कबीर खान यांनी काबूल एक्सप्रेस या सिनेमाचं शुटींग अफगाणिस्तानात केलं. यावेळी त्यांना जीवघेणा अनुभव आला. एका मुलाखतीत त्यांनी हा अनुभव शेअऱ केला आहे. त्यावेळी ते म्हणाली, खरं सांगायचं तर ते खूपच भितीदायक होतं. जे काही घडलं ते म्हणजे आम्हाला मारण्याची धमकी होती. तालिबाननंतर अफगाणिस्तानमध्ये आम्ही पहिल्यांदा शूट करत अफगाणिस्तानमध्ये सर्व काही सुरुळीत सुरु झाल्यानंतर तिथे पहिल्यांदा एका सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. तेही बॉलिवूड सिनेमाचं. त्यामुळे मीडियात येणारी दृश्य सीमेपार असलेल्या तालिबान्यांना खटकत होती. त्यांनी सिनेमा, फोटोग्राफी यांवर बंदी आणली होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली.

    आम्हाला मारण्यासाठी ५ लोकांना पाठवण्यात आलं होतं. अशी माहिती भारतीय राजदूतांनी आम्हाला दिली. त्यामुळे आम्हाला शुटींग थांबवावं लागलं. यानंतर मात्र अफगाण सरकारने सुरक्षा पुरवण्याची टीमला हमी दिल्याचं ते म्हणाले.