निर्माता करण जोहरने केली नव्या बायोपिकची घोषणा!

फ्रीडम फायटर उषा मेहता यांच्यावर आधारीत असलेला हा चित्रपट पुढल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी प्रदर्शित होणार आहे.

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘शेरशाह’ या हिंदी चित्रपटाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. यापूर्वीही करणनं ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ हा वॉर हिरो बायोपीक बनवला. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत रसिकांच्या भेटीला आले.

    त्यानंतर करणनं आता पुढला स्वातंत्र्यदिनही आपल्याच चित्रपटाच्या नावे असेल असे संकेत देत तिसऱ्या वॅार हिरो बायोपीकची घोषणा केली आहे. फ्रीडम फायटर उषा मेहता यांच्यावर आधारीत असलेला हा चित्रपट पुढल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी प्रदर्शित होणार आहे.

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात एकतरी चित्रपट प्रदर्शित करत अनोख्या शैलीत नॅशनल हिरोंना सलाम करण्याचा निर्णय करणनं घेतला आहे. उषा मेहतांवरील चित्रपटाचं दिग्दर्शन कन्नन अय्यर करणार आहेत. त्यांनी यापूर्वी ‘एक थी डायन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.