केदार शिंदे यांनी २५ वर्षापूर्वी केलं होतं पळून जाऊन लग्न, आता लेकीने लावलं ‘लॉकडाउन लग्न’!

९ मे रोजी केदार शिंदेने दुसऱ्यांदा लग्न केले. या लग्नसोहळ्याला काही कलाकारसुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित होते. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल झाले होते.

  मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय दिग्दर्शक, लेखक केदार शिंदेने लॉकडाउनच्या काळाच दुसऱ्यांदा लग्न केलय. त्याच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kedhar Shindde (@kedaarshinde)

  केदार शिंदे यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, ‘हा खुप खास व्हिडिओ आहे.. आमच्या लग्नाला २५ वर्ष पुर्ण झाली.. २५ वर्षांपूर्वी आम्ही पळून जाऊन लग्न केलं. त्यावेळी कोणतेही विधी झाले नाहीत.. २५ वर्षांनंतर आमची मुलगी सना हीने शास्त्रशुद्ध लग्न करायचं ठरवलं. पण लॉकडाउमुळे काही शक्य नव्हतं’  ‘आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, प्रशांत गावकर, रंजित गावकर, सोहम बांदेकर यांच्या मदतीने सनाने पूर्ण तयारी केली. ९ मे रोजी हा घरगुती समारंभ पार पडला.. ९ मे १९९६ रोजी ७५०/- रुपयांत लग्न केलं.. २५ वर्षांनंतर आत्ताच लग्न सुध्दालॉकडाऊनमुळे फारच आटोक्यात पार पडलंय.. या दिवसात खरच काही परवडत नाही.. पण आयुष्यात सकारात्मक राहायचं असेल तर काही तरी करायलाच हवं.. आपल्या शुभेच्छा आशिर्वाद सतत सोबत राहू द्या.. श्री स्वामी समर्थ आहेतच पाठीशी!!!!

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kedhar Shindde (@kedaarshinde)

  ९ मे रोजी केदार शिंदेने दुसऱ्यांदा लग्न केले. या लग्नसोहळ्याला काही कलाकारसुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित होते. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल झाले होते. आता लग्नाचा व्हिडीओ चर्चेत आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.