या DTH युजर्सचा त्रास वाढला, द्यावे लागणार जास्त पैसे

डिश टीव्हीची सेवा घेणाऱ्या युजर्सला हॅपी इंडिया बुकेचा महागड्या किंमतीचा पॅक घ्यावा लागणार आहे. ३०.५० रुपये किंमतीत येणारा हा पॅक १ ऑगस्टपासून बंद होणार आहे.

मुंबई : Dish TV इंडियाच्या युजर्सला आता टीव्ही पाहण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. कंपनी आपल्या लोकप्रिय ३०.५० रुपयांच्या Happy India Bouquet युजर्सला दुसरा पॅक घ्यावा लागणार आहे. कंपनीने याची माहिती आपल्या डीटीएच ब्रँड डिश टीव्ही , जिंग आणि d2h च्या वेबसाइटवर दिली आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने ३०.५० रुपयांचे हे हॅपी इंडिया पॅक १ ऑगस्ट २०२० पासून बंद करण्याची घोषणा केली होती त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

कंपनीने महागड्या किंमतीच्या पॅककडे आपले सब्सक्रायबर्स वळविले

३०.५० रुपये प्रति महिना हॅपी इंडिया पॅक युजर्सला आता सोनी हॅपी इंडिया बुके ३९वर शिफ्ट करण्यात येणार आहे. याची किंमत ३८.५० रुपये आहे असं डिश टीव्हीने स्पष्ट केलं आहे. या महागड्या किंमतीच्या पॅक मध्ये समाविष्ट असलेले ३०.५० रुपयांच्या पॅक्स व्यतिरिक्त दोन अन्य चॅनल सोनी बीबीसी आणि टेन ३ पाहता येणार असे कंपनीने स्पष्ट केले.

हॅपी इंडिया बुके ३१ मध्ये जनरल एंटरटेनमेंट  कॅटेगरीत तीन चॅनलचा समावेश आहे. यात सोनी टीव्ही व्यतिरिक्त सोनी मॅक्सचाही पाहता येईल. तर हॅपी इंडिया बुकेच्या ६ चॅनलच्या पार्टमध्ये सोनी टीव्ही, सब, सोनी पल, सोनी मॅक्स, सोनी मॅक्स २ आणि सोनी वाह यांचा समावेश आहे.

हवे ते चॅनल निवडता येणार

सोनी हॅपी इंडिया बुके चे चॅनल्स सब्सक्रायबर्स आपल्या मर्जीनुसार (a-la-carte) देखील निवडू शकतात असे डिश टीव्हीने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीत म्हटले आहे. युजर डिश टीव्ही ॲप किंवा वेबसाइटवरुन सोनी चॅनल किंवा सोनी बुके निवडू शकतात असेही कंपनीने म्हटले आहे. डिश टीव्ही सब्सक्रायबर्स ८.८ रुपयांपासून ते ८५.३० रुपयांदरम्यान २८ सोनी हॅपी इंडिया बुके ऑफर करतो.

सोनी चॅनलसाठी द्यावे लागणार एवढे पैसे

चॅनलच्या किंमतीबाबत सांगायचं झालं तर सोनी टीव्हीसाठी सब्सक्रायबर्सला १९ रुपये, सोनी मॅक्ससाठी १५ रुपये, सोनी टेन ३ साठी १७ रुपये, सोनी बीबीसीसाठी ४ रुपये आणि सोनी वाहसाठी १ रुपया द्यावा लागेल. सब्सक्रायबर्सला सोनी पल फ्री-टू-एयर चॅनल म्हणूनच ऑफर करण्यात येईल. तर d2h वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार यासाठी दर महिन्याला १ रुपया द्यावा लागणार आहे.