मुंबई पोलिसांनी गु्न्हा दाखल केल्यानंतर दिशाने सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो, म्हणाली…

दिशा न तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिशा समुद्रात असल्याचे दिसत आहे. दिशाने बिकिनी परिधान केली आहे.

  मंगळवारी दुपारी ३ वाजता टायगर आणि दिशा वांद्रे परिसरात बॅंडस्टॅंड या परिसरात फेरी मारताना दिसले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांना अडवले होते. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे दिशा आणि टायगरवर कारवाई करण्यात आली होती. कारवाई झाल्यानंतर दिशा पटानीने पहिल्यांदा एक पोस्ट शेअर केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

  दिशा न तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिशा समुद्रात असल्याचे दिसत आहे. दिशाने बिकिनी परिधान केली आहे. हा फोटो शेअर करताना दिशाला सुट्ट्यांची आठवण येत असल्याचे दिसतं आहे. दिशाच्या या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हा फोटो शेअर करत दिशाने ‘थ्रोबॅक’ हे कॅप्शनही दिले आहे. हा फोटो पाहताच दिशाच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव करत तिची स्तुती केली आहे.

  कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे दिशा आणि टायगरवर कारवाई करण्यात आली होती. टायगर आणि दिशाला पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या वेळी त्यांच्या विरोधात आयपीएस (भादंवि) कलम १८८, कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.