दिशा पटानीच्या बीच लूकने तापमान वाढलं, फोटो बघून चाहत्यांना फुटला घाम!

‘मलंग’ सिनेमानंतर दिशा मोठ्या ब्रेकनंतर सलमान खानच्या ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात लवकरच झळकरणार आहे. त्याचसोबत ‘एक व्हिलन-2’ या सिनेमात अर्जुन कपूर आणि जॉनसोबत ती मुख्य भूमिका साकारणार आहे.

  आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी. दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती आपले बोल्ड फोटो, आणि वर्कआऊट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहतेही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देतात.

  View this post on Instagram

  A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

  दिशाने नुकताच तिचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. एका बीच डेस्टिनेशनचा हा फोटो आहे. या फोटोत दिशाचा हॉट लूक पाहायला मिळतोय. दिशाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. या फोटोत ती हॉटेल बाहेर वाळूत उभी असल्याचं दिसतंय. काही तासातच या फोटला १८ लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत. चाहत्यांसोबतच अनेक सिलिब्रिटींनीदेखील दिशाच्या फोटोला पसंती दिली आहे.