दिशा करतेय नव्या स्क्रिप्टचा अभ्यास, नवा प्रोजेक्ट करणार फायनल

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनने मनोरंजन उद्योगासहित सर्वांच्या आयुष्याला एक ब्रेक लागलेला आहे. त्याचवेळी, अभिनेत्री दिशा पटानी वेळेचा सदुपयोग करून नव्या स्क्रिप्ट समजून घेत आहे. लवकरच दिशा नव्या चित्रपटात नवी भूमिका साकारताना दिसेल.

सध्या दिशा ऑनलाईन झूम नरेशनमध्ये भाग घेते आहे, ती खूपशा नव्या स्क्रिप्ट वाचते आहे आणि लवकरच काही प्रोजेक्ट्स ती फायनल करणार असल्याचे समजते. लॉकडाऊनमधील वेळेची सकारात्मक बाजू पाहाण्याचे तिने ठरवले असून या वेळेचा जेवढा होऊ शकेल तेव्हढा सदुपयोग दिशा करत आहे.

अभिनेत्रीने बॅक टू बॅक दोन मोठ्या ब्रँड एंडोर्समेंटची घोषणादेखील केली असून आपल्या अनोख्या प्रमोशनसोबत ती आणखी नव्या एंडोर्समेंटच्या संधी शोधत आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. कामाशी जोडून राहण्यासाठी नव्या स्क्रिप्ट्स वाचण्यासोबतच अभिनेत्री बरेलीमध्ये आपल्या परिवाराची काळजीदेखील घेत आहे. यासोबतच, दिशा आपल्या वर्कआउट शेड्यूलचेही पालन करत आहे. ती लवकरच आपला आगामी चित्रपट ‘राधे’च्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात करणार आहे.

अभिनेत्रीने ‘मलंग’मधील आपल्या आकर्षक अवतार आणि व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. यासोबतच, दिशा लवकरच ‘एक विलेन २’ मध्ये दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन ‘मलंग’चा दिग्दर्शक मोहित सूरी करणार आहे.