अपघात, आत्महत्या की खून? रागाच्या भरात दिव्या भारती स्वतःला नुकसान करायची, मृत्यूनंतर आईने केले धक्कादायक खुलासे!

दिव्या भारती त्या दिवशी एका अपघातामुळे हे जग सोडून निघून गेली. अपार्टमेंटच्या खिडकीतून पडल्याने तिचा मृत्यू झाला, असे अहवालात म्हटले होते.

    अभिनेत्री दिव्या भारतीचा मृत्यू आजही सगळ्यांसाठी एक रहस्य आहे. अगदी कमी काळात दिव्या भारतीने सगळ्यांच्या मनावर राज्य केलं. तिचा चित्रपट सृष्टीतील प्रवास फार काळ टिकू शकला नाही. अवघ्या ३ वर्षांच्या कारकीर्दीत ती दिग्दर्शकांची आणि प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली. ५ एप्रिल १९९३ ला अचानक तिच्या मृत्यूची बातमी आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला.

    काहींनी तिचा मृत्यू अपघात, काहींनी आत्महत्या आणि काहींनी कट रचल्याचे म्हटले होते. आपली आवडती स्टार दिव्या आता या जगात नाही यावर चाहत्यांना विश्वासच बसत नव्हता.  दिव्या भारती त्या दिवशी एका अपघातामुळे हे जग सोडून निघून गेली. अपार्टमेंटच्या खिडकीतून पडल्याने तिचा मृत्यू झाला, असे अहवालात म्हटले होते. त्याचवेळी अनेकांनी तिचा नवरा साजिद नाडियाडवाला यांच्याबद्दलही शंका उपस्थित केली.

    आईने मुलाखतीत केले धक्कादायक खुलासे

    दिव्या भारती यांच्या मृत्यूविषयी अनेक दावे केले जातात. काहींच्या मते दिव्या मादक पदार्थांच्या नशेत होती. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत दिव्याच्या आईने सांगितले की, घटनेच्या दिवशी दिव्याने रम घेतली होती, पण ती ड्रग्ज घेत नव्हती. या मुलाखतीत दिव्याच्या आईने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. रागाच्या भरात दिव्या भारती स्वतःला नुकसान करायची, असे देखील तिच्या आईने सांगितले होते. तिचा मृत्यू होण्यापूर्वी काही दिवस ती स्वत:ला दुखापत करत होती. दिव्याने तिचे मनगट देखील कापले होते.

    दिव्या भारतीच्या निधनानंतर आई मीता बर्‍याच वर्षांपासून नैराश्यात होती. मुलाखतीत हा एक विचित्र योगायोग असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. दुसरीकडे, साजिद नाडियाडवालाची पत्नी वर्धानेही सांगितले की, जवळपास 6 वर्ष दिव्या तिच्या स्वप्नात येत होती. असं म्हटलं होतं.