divya bhatnagar

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. दिव्याच्या निधनानंतर अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने दिव्याविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये दिव्याचा पती गगन गबरु दिव्याचं शारीरिक व मानसिक शोषण करत होता असं देवोलीनाने म्हटलं आहे. यावेळी आकांक्षाने दिव्यासोबत झालेल्या संभाषणाचे मेसेज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

देवोलीनानंतर आता अभिनेत्री आकंक्षा मल्होत्रानेदेखील काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आकांक्षाने दिव्यासोबत संभाषणाचे मेसेज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आकांक्षाने इन्स्टाग्रामवर दिव्यासोबतचे काही जुने चॅट्स शेअर केले आहेत. यामध्ये दिव्या तिच्या होणाऱ्या छळाविषयी आकांक्षाला सांगताना दिसत आहे. यामध्ये गगन दररोज दिव्याचं मानसिक व शारीरिक शोषण करत होता. तसंच तिला धमकीदेखील देत होता असं या चॅट्सवरुन दिसून येत आहे.

या चॅटमध्ये दिव्याने म्हटलं आहे की, गगन तो एक सुंदर आणि सडपातळ महिला घरकाम करण्यासाठी आणेल, ज्यामुळे त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. त्यासोबतच गगने काही वेळा दिव्यावर हात उचलला असून तिला पट्ट्याने मारल्याचंदेखील दिव्याने म्हटल्याचं या चॅटमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देवोलीनाने सोशल मीडियावर दिव्या भटनागरचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये दिव्याच्या शरीरावर मारल्याच्या खूणा, व्रण होते. या सोबतच देवोलीनाने गगनविरोधातील FIR ची कॉपीदेखील शेअर केली होती.