dj arch junior

तुमचा विश्वास बसणार नाही पण जगातील सगळ्यात कमी वयाच्या(smallest dj in the world) डिजेचं वय फक्त ३ वर्ष आहे. या डिजेच नाव आहे आर्च ज्युनियर(Dj Arch junior).आर्चची कामगिरी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. इतका कमी वयाचा मुलगा डिजे कसा हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

    आपण कुठल्याही पार्टीमध्ये(party) गेलो तर तिथे डिजे(DJ) हा असतोच. डिजेने लावलेल्या गाण्यांवर आपोआप लोकांचे पाय थिरकायला लागतात.डिजे नसेल तर पार्टी अपूर्ण वाटते. आज आम्ही तुम्हाला अशा डिजेबद्दल सांगणार आहोत ज्याने लावलेल्या गाण्यांवर लोक थिरकतातच पण त्याचं वय किती आहे हे जर तुम्ही ऐकलंत तर नाचण्याऐवजी तुम्ही स्तब्ध होऊन जाल.

    तुमचा विश्वास बसणार नाही पण जगातील सगळ्यात कमी वयाच्या डिजेचं वय फक्त ३ वर्ष आहे. या डिजेच नाव आहे आर्च ज्युनियर.आर्चची कामगिरी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. इतका कमी वयाचा मुलगा डिजे कसा हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. डिजे आर्चचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडिओ बघून त्याची खूप स्तुती करत आहेत.

    युट्यूबवर आत्तापर्यंत २१ कोटीपेक्षा जास्त लोकांनी आर्चचा हा व्हिडिओ बघितला आहे. डिजे आर्च हा ‘साऊथ आफ्रिका गॉट टॅलेंट’ च्या सहाव्या सीझनचा विजेता आहे.गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याच्या कामाची नोंद करण्यात आली आहे. त्याने आपली २ गाणीही रिलीज केली आहेत. ‘मॉन्स्टर्स’, ‘मेमरीज’ हे त्याचे दोन्ही ट्रॅक युट्यूब चॅनलवरही उपलब्ध आहेत.