दुरावलेल्या प्रेमींची एकाच कॅबमध्ये अनपेक्षितपणे भेट होते आणि पुढे हे असं घडतं!

आधुनिक काळातील नातेसंबंध व त्यामधील असणारी अस्थिरता दर्शविणार्‍या या लघुपटाची रंजक कथा एकाच कॅबमधून प्रवास करणार्‍या अचानकपणे भेटलेल्या दोन दुरावलेल्या प्रेमींभोवती फिरते.

    रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सतर्फे ‘दोबारा अलविदा’ हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. दुरावलेले प्रेमी एकाच कॅबमध्ये अनपेक्षितपणे भेटल्यानंतर होणाऱ्या आठवणींच्या प्रवासावर हा लघुपट आधारीत आहे. स्वरा भास्कर आणि गुलशन देवैया यांची मुख्य भूमिका असलेल्या या लघुपटाचं दिग्दर्शन शशांक शेखर सिंग यांनी केलं आहे. शशांकचा हा दिग्दर्शनातील पहिलाच प्रयत्न आहे.

    आधुनिक काळातील नातेसंबंध व त्यामधील असणारी अस्थिरता दर्शविणार्‍या या लघुपटाची रंजक कथा एकाच कॅबमधून प्रवास करणार्‍या अचानकपणे भेटलेल्या दोन दुरावलेल्या प्रेमींभोवती फिरते. त्यानंतर दडपलेल्या भावनांचे होणारे चढ-उतार आणि दुरावलेल्या प्रेमींमध्ये पुन्हा एकदा निर्माण होणारी ओढ याबाबतची रंकज कथा आहे. ‘दोबारा अलविदा’बद्दल स्वरा म्हणाली की, नातेसंबंध संपल्यानंतर सहसा दडपलेल्या भावनांचे पैलू समोर येत असल्यानं हा लघुपट माझ्यासाठी खूप खास आहे. आपल्या आयुष्यातील एखादी गोष्ट संपल्यावर क्वचितच आपण त्याचा सामना करतो. हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचा आनंद आहे.

    गुलशन म्हणाला की, ही कथा काही विशिष्ट अशा प्रकारच्या भावनांशी संबंधित आहे. जोपर्यंत आपला त्यांच्याशी अचानक सामना होत नाही, तोपर्यंत या भावना दडपून टाकल्या जातात. शाहबाझ खान यांची निर्मिती असलेल्या या लघुपटाला कृष्णा सोलो यांनी संगीत दिलं असून, मानस मित्तल यांनी संकलन केलं आहे.