devmanus serial

‘देवमाणूस’(devmanus) या मालिका(serial) सध्या लोकप्रिय आहे. अभिनेता किरण गायकवाड याची या मालिकेमध्ये मुख्य भूमिका आहे. सध्या या मालिकेमध्ये डॉ. अजितचं बिंग फुटणार असल्याची चिन्ह आहेत.

‘देवमाणूस’(devmanus) या मालिका(serial) सध्या लोकप्रिय आहे. अभिनेता किरण गायकवाड याची या मालिकेमध्ये मुख्य भूमिका आहे. सध्या या मालिकेमध्ये डॉ. अजितचं बिंग फुटणार असल्याची चिन्ह आहेत. सरु आजीमुळे होणार त्रास पाहता अजित तिचा काटा काढणार आहे.

‘देवमाणूस’ या मालिकेत अजितने मंजूच्या जमिनीविषयी  अफवा पसरवल्या आहे. या अफवांचा सरु आजीमुळे सुगावा लागणार आहे. अजित संजूचा खून करुन त्याचा मृतदेह खड्ड्यात पुरत असताना सरु आजी तिथे येते. सरु आजीने सगळं पाहिलं तर नाही ना अशी भीती अजितच्या मनात आहे. सरु आजी पोलिसांकडे गेल्याने अजितची चिंता वाढली आहे. तो आजीला मारून टाकण्याच्या तयारीत आहे.

सरु आजीला मारण्याचा अजितचा डाव यशस्वी होतो का? हे आता मालिकेच्या येत्या भागात समजेल.