Doctor Don in the series Kabir Sakartana says Anurag Worlikar
"डॉक्टर डॉन या मालिकेमध्ये कबीर साकारताना...", सांगतोय अनुराग वरळीकर

झी युवा वरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मीडियावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय. मग तो डॅशिंग डॉन देवा म्हणजेच देवदत्त नागे असो समंजस आणि कडक शिस्तीच्या डॉ. मोनिका म्हणजेच श्वेता शिंदे असो किंवा मालिकेमधले तरुण चेहरे कबीर आणि राधा म्हणजेच अभिनेता अनुराग वरळीकर किंवा प्रज्ञा चवांडे असो. या कलाकारांचा चाहतावर्ग सध्या चांगलाच वाढताना दिसतोय.

कबीर म्हणजे डॉ मोनिका यांचा मुलगा, मेडिकल कॉलेजच्या डीन असणाऱ्या डॉ. मोनिका यांचा हा मुलगा त्यांच्याच सारखा शिस्तीत वाढलेला, समंजस आणि प्रामाणिक आहे. यामुळे सध्या अनेक तरुण तरुणी कबीरचे चाहते बनलेत. कबीर साकारणारा अनुराग चाहत्यांच्या या प्रेमाने चांगलाच भारावून गेलाय. आणि या निमित्तानं कबीर आणि अनुराग यांच्यातल्या साम्य भेदाबद्दल तो आपले मत मांडतोय.

अनुरागच्या मते कबीर आणि त्याच्या स्वतःमध्ये काही गोष्टी सारख्या आहेत तर काही वेगळ्या आहेत, ते सांगताना अनुराग म्हणाला, “कबीर हा खूप शिस्तीने वागणारा आहे म्हणजे त्याचे प्रत्येक दिवसाचे टाईमटेबल ठरलेले असते आणि तो ते काटेकोरपणे वागतो तसंच माझं पण आहे मला पण प्रत्येक्ष आयुष्यामध्ये माझं टाईमटेबल नियमितपणे पाळायला आवडतं आणि मी ते पाळतोही. याउलट मालिकेमधला कबीर खूपच सिन्सिअर म्हणजे प्रामाणिक दाखवलाय तो नियम पाळतो त्या नियमानुसार जगतो, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मी तसा बिलकूल नाही आहे. मला धमाल मस्तीमध्ये जगायला आवडतं. शूट करतानाही मी खुप मस्ती करत असतो मला इतकं शांत आणि निरसपणे जगायला नाही आवडत.”

डॉक्टर डॉन ही मालिका सध्या टिव्हीवर चांगलीच गाजतेय ते या मालिकेमधल्या नवनवीन ट्विस्ट आणि टर्नमुळे. मालिकेची रंगत अधिकाधिक वाढू लागलीये. त्यामुळे मालिकेचे आगामी भाग पहायला विसरु नका.