आर्यनच्या सुटकेवर आजही शंका, ड्रग्ज प्रकरणात NCB करणार सखोल चौकशी ; आईच्या वाढदिवसाआधी मिळणार का जामीन?

दंडाधिकारी न्यायालय हे विशेष कोर्ट आहे आणि NDPS कायद्यामध्ये न्याय किंवा सुटका देण्याचा अधिकार न्यायालयाजवळ नाहीये. अशातच आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांचा असा प्रयत्न आहे की, न्यायालयाने आर्यनची रिमांड संपवून त्याला तुरुंगात पाठवण्याचे आदेश जारी करावेत, जेणेकरून तो शुक्रवारी उच्च न्यायालयात जामिनासाठी अपील करू शकेल.

    ड्रग्ज प्रकरणात किंग खान बॉलिवूड सुपरस्टारचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) सुटकेवर आजही शंका निर्माण होत आहेत. दुपारी २ वाजताच्या सुमारास मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयात (Metropolitan Court) कोर्टमध्ये हजर राहण्यास सांगितलं होतं. परंतु आज आर्यनला जामीन मिळणार का? यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ड्रग्ज प्रकरणात एनसीबी (NCB) चौकशीसाठी कोठडीची मुदतवाढ मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या प्रकरणात एका विदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शनविषयी अधिक तपासणी केली जात आहे. त्यामुळे NCB ला चौकशी करण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे.

    दुसरीकडे, दंडाधिकारी न्यायालय हे विशेष कोर्ट आहे आणि NDPS कायद्यामध्ये न्याय किंवा सुटका देण्याचा अधिकार न्यायालयाजवळ नाहीये. अशातच आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांचा असा प्रयत्न आहे की, न्यायालयाने आर्यनची रिमांड संपवून त्याला तुरुंगात पाठवण्याचे आदेश जारी करावेत, जेणेकरून तो शुक्रवारी उच्च न्यायालयात जामिनासाठी अपील करू शकेल.

    गुरुवारी आर्यन खानला पुन्हा वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय चाचणीनंतर २ वाजता न्यायालयात हजर राहता येईल. अशी अपेक्षा आहे की, आज या प्रकरणावर खूप लांब चर्चा होऊ शकते. एनसीबी नवीन पुरावे आणि नवीन अटकेच्या बहाण्याने आर्यनची रिमांड वाढवण्याचा प्रयत्न करेल.

    आईच्या वाढदिवसाआधी मिळणार का जामीन?

    आर्यनची आई गौरी खानचा ५०वा वाढदिवस शुक्रवारी आहे. आर्यनच्या अटकेपूर्वी गौरीचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची योजना होती. मन्नतमध्ये मोठी पार्टी आयोजित केल्याची चर्चाही होती, पण आर्यनच्या अटकेनंतर सेलिब्रेशन रद्द करण्यात आले आहे. जर आर्यनची रिमांड आज वाढवली नाही आणि आर्यनला शुक्रवारी जामीन मिळाला, तर गौरीसाठी ही सर्वात मोठी वाढदिवसाची भेट ठरणार आहे.