amol kolhe

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका  म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते अभिनेते अमोल कोल्हे. डॉ. अमोल कोल्हे यांनी ही भूमिका अजरामर केली आहे. आता अमोल पुन्हा एकदा छत्रपतींच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत.

जा शिवछत्रपती मालिकेतून पहिल्यांदा डॉ. कोल्हे छोट्या पडद्यावर शिवाजी महाराज म्हणून अवतरले. पुढे अनेक नाटकांतूनही त्यांनी ती भूमिका साकारली. शिवाजी महाराजांच्या महानाट्यातूनही ते दिसले.

शिवाजी महाराज म्हणजे डॉ. कोल्हे असं समीकरण झालं. असं असतानाच संभाजी राजांवरच्या मालिकेतून ते संभाजी महाराज बनूनही आले. रसिकांना त्यांची ही व्यक्तिरेखेवरही प्रचंड आवडली. पण पुन्हा ते छत्रपतींच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सध्या सोनी मराठीवर चालू असलेल्या स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे शिवराय बनून येणार आहेत. सध्या मालिकेतले शिवराय लहान आहेत. पण आता मालिकेतला शिवराय मोठे होणार आहेत. त्यामुळे ही भूमिका अमोल कोल्हे साकारतील. साहाजिकच जिजामाता देखील बदलण्यात येईल. एखादी प्रसिद्ध अभिनेत्री ही भूमिका साकारू शकते. ही भूमिका कोण साकारणार हे अद्याप समजलेलं नाही.  या मालिकेचे निर्मातेही डॉ.अमोल कोल्हे यांची जगदंब क्रिएशन्स ही संस्थाच आहे.