महिलेचा साडी नेसून ‘झिंगाट’ वर्कआऊट, जिम सुरू झाल्याचा असा व्यक्त केला आनंद,Video होतोय व्हायरल!

जिम सुरू झाल्याचा आनंद एका महिलेने चक्क साडी नेसून केला आहे. या महिलेनं साडी नेसून झिंगाट गाण्यावर डान्स केला आहे.

    कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊन अंतर्गत पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले होते. यात अत्यावश्यक सेवा वगळता, मॉल्स, जिम, दुकानं आणि इतर ठिकाण पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र, आता कोरोना काहीसा आटोक्यात आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा अनलॉक अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात जिम देखील सुरु करण्यात आल्या आहेत.

    जिम सुरू झाल्याचा आनंद एका महिलेने चक्क साडी नेसून केला आहे. या महिलेनं साडी नेसून झिंगाट गाण्यावर डान्स केला आहे. सोशल मीडियावर या महिलेच खूप कौतुक करण्यात येत आहे. साडी नेसून जिम वर्क आऊट करणाऱ्या या महिलेने अनेकांना व्यायामाची प्रेरणा दिली आहे.

    जिममध्ये साडी नेसून ‘झिंगाट’ गाण्यावर व्यायाम, पुशअप्स करणाऱ्या या महिला पुण्यातील आहारतज्ज्ञ आहे. डॉ. शर्वरी इनामदार असे त्यांचे नाव आहे. त्या आयुर्वेद एम.डी. आहेत. डॉ. शर्वरी इनामदार या नेहमीच जिममधील व्यायाम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, त्यांच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘जिम सुरु झाल्याचा आनंद..’ असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.