अनेक चित्रपट आणि मालिकांत काम केलेल्या अभिनेत्रीचं कोरोनामुळे निधन, आयुषमानबरोबरही केलं होतं काम!

 अनेक चित्रपटात दिसलेल्या रिंकूचा हॅलो चार्ली हा अमॅझॉन प्राइमचा शेवटचा चित्रपट ठरला. चिडियाघर शिवाय ती बालवीर या मालिकेतही दिसली होती.

    आणखी एका अभिनेत्रीचं कोरोनाने निधन झालं आहे. रिंकू सिंग निकुंभ असं तिचं नाव आहे. तिने ‘ड्रिमगर्ल’सह आणखी काही चित्रपटांत काम केलं होतं. अभिनेता आयुषमान खुराना सोबत काम केलेली रिंकू ही छोट्या पडद्यावरील चिडियां घर या मालिकेतून नावारुपास आली होती. ती एक थिएटर आर्टिस्ट होती.

    रिंकूची चुलत बहिण चंदाने दिलेल्या माहितीनुसार, रिंकूचा २५ मे ला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ती घरातच कॉरन्टाइन होऊन औषध घेत होती मात्र तिचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे तिला दवाखान्यात भरती करण्यात आलं. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र अचानक ती सगळ्यांना सोडून गेली. चंदाने पुढे सांगितलं की रिंकू एक अस्थमाची पेशंट होती. तिने ७ मे ला कोव्हॅक्सिन लस देखिल घेतली होती. रिंकूच्या घरातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे रिंकूलाही लागण झाली.

     अनेक चित्रपटात दिसलेल्या रिंकूचा हॅलो चार्ली हा अमॅझॉन प्राइमचा शेवटचा चित्रपट ठरला. चिडियाघर शिवाय ती बालवीर या मालिकेतही दिसली होती.