akshay kumar

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर(sushant sing rajput death) बॉलिवूडमधील ड्रग्जच्या व्यवहाराबाबत(bollywood drugs connection) दररोज नवनव्या बातम्या समोर येत आहेत. या प्रकरणावर आत्तापर्यंत मौन बाळगून असलेल्या अक्षय कुमारने(akshay kumar) बॉलिवूडमध्ये ड्रग्ज हे वास्तव असल्याची कबुली दिली आहे.

बॉलिवूडमध्ये असे काही होत नाही, असे ह्रद्यावर हात ठेवून मी खोटे कसे सांगू, या आशयाचा एक व्हिडीओ अक्षयने प्रसिद्ध केला आहे. प्रत्येक व्यवसायात असे प्रकार घडतात, याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाचा त्यात सहभाग आहे, असेही त्याने म्हटले आहे. ड्रग्ज प्रकरणात तपास यंत्रणा आणि न्यायालय जी कारवाई करेल, ती योग्यच असेल, असेही त्याने म्हटले आहे.

बॉलिवूडमधील प्रत्येक जण ड्रग्ज प्रकरणातील तपासात सहकार्य करेल, अशी आशाही अक्षयकुमारने व्यक्त केली आहे.पण यासाठी संपूर्म सिनेजगताला बदनामीच्या दृष्टीतून बघणे चुकीचे असल्याचेही त्याने सांगीतले आहे. प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने आपले काम करावे, असे आवाहनही त्याने केले आहे.