ajay-devgn

एका ट्विटर वापरकर्त्यानं या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे, 'तो अजय देवगण आहे की नाही हे मला माहिती नाही. पण शेतकरी आंदोलनाबाबत लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

  दिल्लीत मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होतं असताना सोशल मीडियावर असं म्हटलं जात आहे की,  संबंधित मार खाणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आहे.

  सोशल मीडियावर अजयची चर्चा

  या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अभिनेता अजय देवगण दारुच्या नशेत होता. कार पार्किंगच्या जागेवरून त्याची एका व्यक्तीसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर या वादाच रुपांत मारामारीत झालं. असं असलं तरी व्हिडीओ अस्पष्ट असून यामध्ये भांडण करणाऱ्या व्यक्तींचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही.

   

  एका ट्विटर वापरकर्त्यानं या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे, ‘तो अजय देवगण आहे की नाही हे मला माहिती नाही. पण शेतकरी आंदोलनाबाबत लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मार खाणारी व्यक्ती अजय देवगण आहे असा दावा केला जात आहे.’

  काय आहे तथ्य

  या व्हिडीओची पडताळणी केली असता, हा व्हिडीओ राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एअरोसिटी येथील आहे. काल रात्री कार पार्किंगवरून दोन गटात वाद झाला आहे. या भांडणात बरीच लोकं सामील होते. त्यांनी एका व्यक्तीला पकडून त्याला चांगलीच मारहाण केली आहे. पण या घटनेचा अजय देवगणशी काही संबंध नसल्याचं आमच्या पडताळणीत समोर आलं आहे.  या घटनेनंतर मुख्य आरोपीला  पोलिसांनी अटक केली आहे.